बायकोच्या जाचाला कंटाळून १० लाख पुरूषांनी केली आत्महत्या


नवी दिल्ली – पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याच्या घटना गेल्या कित्येक दिवसांपासून समोर येत आहेत. आपण पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे आपल्या सुसाईड नोटमध्ये अगदी सिनेसृष्टीतील ढाल ताशे चित्रपटाचे निर्माते यांनी देखील लिहिले होते आणि या घटनेनंतर पुन्हा एकदा पुरूषांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नाशिकमध्ये काही वर्षांपूर्वी पीडित पुरूषांनी एकत्र येऊन संस्था सुरू केली आणि महिलांकडून आपल्या सुरक्षित कायद्याचा गैरवापर करून पुरूषांना त्रास दिला जात असल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, २१ वर्षात देशभरात तब्बल १० लाख ३३ हजार ९७६ विवाहित पुरूषांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आपल्या पत्नीच्या त्रासाला किंवा तिच्या स्वभावाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या माहितीनुसार, २०१५मध्ये देशभरात तब्बल ६४ हजार ५३४ विवाहित पुरूषांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. तर २०१३, २०१४ साली अनुक्रमे ६५,०९८ आणि ५९,७४४ हजार लग्न झालेल्या पुरूषांनी आपले जीवन संपवले आहे.

Leave a Comment