पेट्रोलपंपावर मिळणार रास्त दरात एलईडी दिवे, पंखे


केंद्र सरकारच्या उजाला कार्यक्रमांतर्गत कार्यरत असलेल्या ईईसीएल (एनर्जी एफिशिएन्ट सर्व्हीस लिमीटेडकडून देशभरातील पेट्रोल पंपावर अत्यंत किफायतशीर दरात एलईडी बल्ब, ट्यूब्ज व पंखे विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जात आहेत. या संदर्भात एचपी, भारत पेट्रोलियम व इंडियन ऑईल कंपन्यांबरोबर एक सहकार्य करार केला जात असून त्याची तारीख लवकरच जाहीर होत आहे. वास्तविक हा करार गुरूवारीच होणार होता मात्र पर्यावरण मंत्री दवे यांच्या निधनामुळे तो पुढे ढकलला गेला आहे.

करार झाल्यानंतर १ महिन्यात वरील वस्तू पेट्रोलपंपावर उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. देशभरात वरील कंपन्यांचे ५३ हजार पेट्रोलपंप आहेत मात्र या सर्व पेट्रोलपंपावर या वस्तू उपलब्ध होतील वा नाही याचा खुलासा अद्याप केला गेलेला नाही.खुल्या बाजारात एलईडी ट्यूब्जच्या किंमती ६०० ते ७०० रूपये आहेत. या ट्यूब पेट्रोललपंपावर २३० रूपयांत, बल्ब १०० ऐवजी ६५ रूपयांत तर पंखे १७०० ते १८०० रूपयांऐवजी ११५० रूपयांत मिळणार आहेत.

Leave a Comment