बीएमडब्ल्यूची एम ७६० ली कार सादर


जर्मन लक्झरी कार निर्मात्या बीएमडब्ल्यू ने गुरूवारी त्यांच्या एम सेव्हन सिरीजमधील दोन नव्या कार सादर केल्या आहेत. या कार्सच्या किंमती २ कोटी २७ लाख( एक्स दिल्ली शो रूम) आहेत. पेट्रोल व्हेरिएंटमधील या कार अतिशय पॉवरफुल व्ही १२ इंजिनसह व बीएमडब्ल्यूच्या सिग्नेचर एक्स ड्राईव्ह म्हणजे ऑल व्हिल ड्राईव्ह स्टँडर्ड सिस्टीमसह आहेत.

कंपनीचे भारतातील प्रमुख विक्रम पवार या संदर्भात म्हणाले, या कार्समुळे आमच्या उच्च श्रेणी पोर्टफोलियोचा विस्तार होण्यास मदत मिळणार आहे. या कार्समुळे आमच्या भारताच्या बाजारात आमच्या पाच पेट्रोल व तीन डिझेल व्हेरिएंट कार्स उपलब्ध झाल्या आहेत. ही कार ० ते १०० किमीचा वेग ३.७ सेकंदात घेते तर तिचा टॉप स्पीड आहे २५० किमी. मात्र ही कार ताशी ३०५ किमीचा वेगही घेऊ शकते व त्यासाठी स्पीड मीटरवर ३२५ किमी पर्यंतचा वेग दाखविण्याची सुविधा दिली गेली आहे.

कारला ६.६ लिटरचे एम परफॉर्मन्स ट्वीन पॉवर टर्बो व्ही १२ इंजिन दिले गेले आहे. त्याला आठ स्पीड स्टेपट्राॅनिक ऑटो ट्रान्समिशनची जोड दिली गेली आहे. कारचे इंटिरियअरही देखणे बनविले गेले आहे. लेदर सीटस, लेटर व्हील, बरोबरच बाहेरच्या बाजूला हॉरिझॉल एलईडी हेडलँप दिले गेले आहेत.

Leave a Comment