शाओमीने लाँच केला बजट स्मार्टफोन रेडमी ४ व स्मार्ट राउटर


मुंबई – भारतीय बाजारात आणखी एक नवीन स्मार्टफोन चीनी स्मार्टफोन निर्माती कंपनी शाओमीने रेडमी ४ लाँच केला असून कंपनीने त्याचबरोबर आपला पहिला स्मार्ट राउटर एमआय ३ सी ही लाँच केला आहे. तीन व्हेरिएंटमध्ये रेडमी ४ उपलब्ध आहे. २ जीबी रॅम व १६ जीबी स्टोरेज, ३ जीबी रॅम ३२ जीबी स्टोरेज तसेच ४ जीबी रॅम ६४ जीबी स्टोरेजमध्ये हे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. ज्यांची किंमती अनुक्रमे ६,९९९ रुपये, ८,९९९ रुपये आणि १०,९९९ रुपये आहेत.

या नव्या स्मार्टफोनचा सेल २३ मे रोजी दुपारी १२ वाजता आहे. हा फोन ग्राहक एमआय डॉट कॉम आणि ऑनलाईन शॉपिंग कंपनी अॅमेझॉनच्या साईटवरून खरेदी करू शकतात. शाओमी कंपनीचे उपाध्यक्ष आणि कंपनीच्या भारतीय परिचालनचे व्यवस्थापक मनु जैन यांनी सांगितले की, रेडमी ४ रेडमी ३ एसचे अपग्रेड व्हर्जन आहे. आम्हाला विश्वास आहे की, रेडमी ४ सुद्धा एमआई फॅन्स यूजर्सच्या अपेक्षांवर खरा उतरेल. या फोनच्या माध्यमातून कमी किंमतीत उच्च गुणवत्तेचे फिचर्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याचबरोबर कंपनीने एमआय राउटर ३ सी लाँच केला आहे. त्याची किंमत १,१९९ रुपये आहे. हा एक स्मार्ट राउटर आहे. याचा स्मार्टफोनच्या एमआय वाय-फाय अॅपच्या माध्यमातूनही अॅक्सेस केला जाऊ शकतो. हा राउटर एमआय डॉट कॉमवर २३ मे पासून तर फ्लिपकार्ट व अॅमेझॉनवर ८ जूनपासून विक्रीसाठी उपलब्ध असेल.

Leave a Comment