
फेसबुकने लाईकबरोबर रिअॅक्शन बटण गेल्यावर्षी आणले होते. या रिअॅक्शन बटणमुळे आपल्याला एखाद्या पोस्टवर राग, आनंद, प्रेम यासारख्या भावना इमोजीद्वारे व्यक्त करता येतात. पण स्मायलीबरोबर येथे गेल्या दोन तीन दिवसांत जांभळ्या रंगाचे एक फुलही दिसू लागले होते. फेसबुकवरचे हे नवे रिअॅक्शन बटण सगळ्यांनाच खूप आवडले होते.
फेसबुकवरचे जांभळे फूल कोमजले ?
या जांभळ्या फुलाचा पर्याय एखाद्या पोस्टवर आभार मानायचे असतील तर त्यासाठी दिला होता. पण आता फेसबुकवरचे हे फूल अचानक गायब झाल्यावर अनेक जण संभ्रमात पडले. फेसबुकवरची जांभळी फूले कोमेजली म्हणून झुक्याने ती काढून टाकली की काय? असे विनोदही ऐकायला मिळाले. पण कदाचित अनेकांना माहिती नसेल की खास ‘मदर्स डे’निमित्त फुलाचे हे रिअॅक्शन बटण लाँच करण्यात आले. फेसबुकने युजर्सना आईचे आभार मानण्यासाठी मदर्स डेची ही खास भेट दिली होती. तेव्हा फक्त ‘मदर्स डे’पुरते हे रिअॅक्शन बटण देण्यात आले होते.
