पेटीएमची पेमेंट बँक २३ मे पासून सुरू होणार


नवी दिल्ली – अनेक महिन्यांच्या विलंबानंतर २३ मे पासून अखेरीस पेटीएम पेमेंट बँक सुरू होत असून रिझर्व्ह बँकेची त्यासाठी मंजुरी मिळाली आहे.

पेटीएमने जारी केलेल्या एका प्रसिद्ध पत्रकामध्ये म्हटले आहे की, रिझर्व्ह बँककडून पेटीएम पेमेंट बँक लिमिटेड (पीपीबीएल) ला परवानगी मिळाली आहे. २३ मे पासून ही बँक कामकाजास सुरुवात करणार आहे. आपल्या वॉलेटचा संपूर्ण कारभार पेटीएम पीपीबीएलमध्ये स्थानांतरित करणार आहे. २१.८० कोटी मोबाइल वॉलेटचा वापर करणारे लोक यामध्ये जोडले गेले आहेत. पेमेंट बँकेचा परवाना भारतीय निवासी विजय शेखर शर्मा यांना मिळाला आहे. विजय शेखर शर्मा पेटीएमच्या मालकीची कंपनी वन ९७ कम्युनिकेशन्सचे संस्थापक आहेत.

पेटीएम वॉलेटचे कामकाज २३ मे नंतर पीपीबीएल मार्फत चालवले जाईल. जर एखाद्या ग्राहकाला असे नको असेल तर त्याला याची सूचना पेटीएमला द्यावी लागेल. सूचना प्राप्त झाल्यानंतर पेटीएम त्याच्या वॉलेटमधील शिल्लक रक्कम संबंधित ग्राहकाच्या बँक खात्यात हस्तांतरित करेल. परंतु अशा प्रकारची सूचनी २३ मे पूर्वी द्यावी लागेल. मागील ६ महिन्यांपासून जर वॉलेटमध्ये कोणताही व्यवहार झालेला नसेल तर ग्राहकांच्या विशेष संमतीचे ते पैसे पीपीबलमध्ये ट्रांसफर केले जातील. पेटीएमची पेमेंट बँक व्यक्ती आणि छोट्या व्यावसायिकांकडून प्रति खाता १ लाख रुपयांपर्यंत डिपॉजिट स्वीकार करेल. याआधी पेटीएमची पेमेंट बँक मागील वर्षी दिवाळीच्या दरम्यान सुरू होण्याची चर्चा सुरू होती. परंतु सहा महिन्यांच्या विलंबाने आता ही बँक सुरू होत आहे.

Leave a Comment