मुंबई – सध्या एका मेसेजने सोशल मीडियात प्रचंड धुमाकूळ घातला असून तुम्हाला फोन ७७७८८८९९९ या नंबरवरुन आल्यास तो कॉल रिसिव्ह करु नका. हा कॉल रिसिव्ह केल्यास तुमच्या फोनचा स्फोट होईल असे म्हटले जात आहे. वा-याच्या वेगाने हा मेसेज प्रचंड व्हायरल होत आहे. पण, या मागचे सत्य काय आहे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
व्हायरल झालेल्या ‘त्या’ नंबरचे जाणून घ्या सत्य
सध्या सर्वत्र ७७७८८८९९९ या नंबरचीच जोरदार चर्चा रंगली असून विविध मेसेजेसही या नंबरसंदर्भात व्हायरल होत आहेत. कुणी म्हणत आहे या फोन नंबरवरुन फोन आल्यास रिसिव्ह करु नका कारण तो एक व्हायरस आहे. कुणी म्हणत आहे हा फोन कॉल रिसिव्ह केल्यास स्फोट होतो. पण प्रत्यक्षात काही वेगळच आहे.
विविध मेसेजेस ९ अंकांच्या या फोन नंबरसंदर्भात व्हायरल होत आहेत. नागरिकांमध्ये या मेसेजेसमुळे भीतीची वातावरणही निर्माण होत आहे. पण तुम्ही काहीही काळजी करु नका. हा कुठल्याही प्रकारचा व्हायरस नाही आणि या क्रमांकावरुन फोन केल्यास स्फोटही होणार नाही त्यामुळे तुम्ही निर्धास्त रहा.
दोन तीन दिवसांपासून ७७७८८८९९९ या क्रमांकावरून आलेला फोन उचलू नका असा मेसेज व्हायरल होत असून आणि कुठलाही विचार न करता लोकही हे मेसेजेस फॉरवर्ड करत आहेत. तसेच पूढे लिहित आहेत की या क्रमांकावरुन फोन आल्यास रिसिव्ह करु नका. पण तसे काहीही नाही. सोशल मीडियात काही लोकांनी या नंबरसंदर्भात मेसेज व्हायरल केला असल्यामुळे लोकांच्या मनात विविध भ्रम निर्माण झाले आहेत. हा नंबर कुणाचा आहे? नंबर बरोबर आहे की चुकीचा आहे? याची तपासणी न करताच लोक या मेसेजवर विश्वास ठेवत आहेत आणि मेसेजही फॉरवर्ड करत आहेत.
पण प्रत्यक्षात या मेसेज किंवा नंबरपासून घाबरण्याची कोणतीही आवश्यकता नाही. काही खोडसाळ व्यक्तींनी ७७७८८८९९९ हा नंबर मेसेजमध्ये टाकून तो मेसेज व्हायरल केला आहे. तसेच ७७७८८८९९९ या नंबरसंदर्भात घडलेली कुठलीही घटना अद्याप समोर आलेली नाही. कोणत्याही प्रकारचे तथ्य या मेसेजेसमध्ये नाही. भारतात कोणताही फोन क्रमांक हा १० आकड्यांचा असतो आणि हा फोन क्रमांक नीट पाहिला तर तो ९ आकड्यांचा असल्यामुळे या नंबरबाबत व्हायरल होणारे मेसेजेस केवळ अफवाच आहे.