इस्रोमुळे इंटरनेट होणार सुपर फास्ट


नवी दिल्ली – इस्रोकडून तीन उपग्रह देशातील इंटरनेट सेवा अधिक वेगवान करण्यासाठी सोडले जाणार असून पुढील १८ महिन्यांमध्ये इस्रोकडून जीसॅट-१९, जीसॅट-११ आणि जीसॅट-२० या तीन उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. टीव्ही आणि स्मार्टफोन क्षेत्रात या तीन उपग्रहांच्या प्रक्षेपणामुळे मोठे बदल घडणार आहेत. स्मार्ट सिटी प्रकल्पांमधील संपर्क यंत्रणेसाठी इस्रोकडून सोडल्या जाणाऱ्या उपग्रहांचा वापर केला जाणार आहे.

जूनमध्ये ‘जीसॅट-१९ चे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. दूरसंचार यंत्रणेतील सक्षमीकरणात महत्त्वाची भूमिका जीसॅट-१९ उपग्रह बजावणार आहे. देशातील दूरसंचार व्यवस्था यामुळे अधिक वेगवान होईल, अशी माहिती अहमदाबादमधील स्पेस अॅप्लिकेशन्स सेंटरचे (एसएसी) तपन मिश्रा यांनी दिली. संपर्क क्षेत्रात व्हॉईस आणि व्हिडीओमुळे झालेला बदल सगळेच अनुभवत आहेत. मात्र येत्या काळात तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून वायरलेस तंत्रज्ञानाने टीव्ही पाहू शकता. इस्रोकडून करण्यात येणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या प्रक्षेपणामुळे भविष्यात हे सर्व शक्य होणार असल्याचे देखील मिश्रा यांनी म्हटले आहे.

Leave a Comment