वयाच्या ८२व्या वर्षी १२वीची परीक्षा पास झाले ‘हे’ माजी मुख्यमंत्री


नवी दिल्ली – शिक्षणासाठी कुठल्याही प्रकारची अट नसते, असे म्हणतात. शिकण्याची इच्छा आणि जिद्द असेल तर कुठलाही व्यक्ती कुठल्याही वयात आणि परिस्थितीत शिक्षण घेतो. पण आम्ही तुम्हाला आज अशाच एका माजी मुख्यमंत्र्यासंदर्भात सांगणार आहोत ज्यांनी बारावीची परीक्षा वयाच्या ८२व्या वर्षी दिली आणि ते उत्तीर्णही झाले आहेत.

वयाच्या तब्बल ८२ व्या वर्षी हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांनी बारावीची परीक्षा दिली आणि ते चक्क उत्तीर्णही झाले आहेत. ते या परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. चौटाला यांचा आत्मविश्वास या वयातही १२ वी पास झाल्याने आणखीन वाढला असून आता त्यांनी पदवी परीक्षेला बसण्याची तयारी सुरू केली आहे.

चौटाला यांनी तिहार तुरूंगातूनच परीक्षा दिली आणि ते उत्तीर्ण झाले आहेत. ओमप्रकाश चौटाला आणि त्यांचे पुत्र अजय यांना जेबीटी शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी १६ जानेवारी २०१३ रोजी १० वर्षांची शिक्षा ठोठावली होती. सध्या ते दिल्लीच्या तिहार जेलमध्ये आहे. तिहार तुरूंगात शिक्षा भोगत असून शिक्षा भोगत असतानाच त्यांनी १२ वीची परीक्षाही दिली होती.

Leave a Comment