गुगलचे अँड्राईड ओ येतेय


गुगलने त्यांच्या आय ओ २०१७ लाँचिंग कार्यक्रमात त्यांचे अँड्रोईड नगेटच्या पुढचे व्हर्जन अँड्राईड ओ येत असल्याचे जाहीर केले आहे. विशेष म्हणजे हे ओ व्हर्जन अशा प्रकारे ऑप्टिमाईज केले आहे की कमी रॅम असलेल्या म्हणजे अगदी ५१२ एमबी रॅम असलेल्या स्मार्टफोन्सवरही ते सहज चालू शकणार आहे. या कार्यक्रमात गुगलने त्यांच्या नव्या प्रॉडक्टशी माहितीही दिली.

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी अनेक अपडेटेड व्हर्जनसंदर्भात माहिती देतानाच कांही नव्या टेक सेवांची घोषणाही केली. आपल्या की नोटमध्ये ते म्हणाले, गुगल नोकरीच्या शोधात असणार्‍यांसाठी नोकरी देणार्‍यांशी गाठ घालून देण्यासाठीही मदत करत आहे. त्यासाठी गुगलने गुगल जॉब्ज प्रोजेक्ट तयार केला आहे. यासाठी लिंक्डेनशी भागीदारी करारही केला गेला आहे. सध्या ही सेवा फक्त अमेरिकेपुरती मर्यादित असून लवकरच जगभर तिचा विस्तार केला जाईल. यात गुगल सर्चमध्ये जॉब सर्चिंग टूल असेल व ज्या प्रकारच्या नोकरीचा शोध तुम्ही घेता आहात, ते तुमच्या समोर येईल.

गुगल लेन्स नावाचे नवे फिचरही गुगलने आणले आहे. यात कोणतीही वस्तू ओळखण्यास मदत मिळणार आहे. जी वस्तू पाहायच्या तिच्या दिशेने स्मार्टफोनच्या कॅमेरा वळवला की ती वस्तू ओळखता येईल. टेक्स्ट पासवर्ड कडे कॅमेरा वळवला तर पासवर्ड आपोआप एन्टर होईल.

Leave a Comment