ऑस्ट्रियन वाहन कंपनी केटीएमने त्यांच्या ऑफरोडिंग क्रेझी ग्राहकांसाठी दोन नव्या बाईक्स युयोपियन युनियनमध्ये सादर केल्या आहेत. केटीएम २५० इएक्ससी टीपीआय व केटीएम ३०० इएक्ससी टीपीआय या जगातल्या अशा पहिल्या बाईक्स आहेत ज्यात फ्यूल इंजेक्शन सिस्टीम दिली गेली आहे. या टू स्ट्रोक बाईक्स आहेत हेही त्यांचे आणखी एक वैशिष्ठ.
केटीएमच्या दोन नव्या वैशिष्ठपूर्ण बाईक्स लाँच
फ्यूल इंजेक्शन सिस्टीममध्ये इंजेकटर्स इंधन सिलींडरच्या ट्रान्स्फर पोर्ट पर्यंत पोहोचवितात. त्यामुळे इंधनाची बचत होते व ऑफ रोडिंग बायकिंगमध्ये इंजिनाचे नुकसान होण्याचा धोकाही टळतो. या दोन्ही बाईक्सची इंधन क्षमता ९.२५ लिटरची असून दोन्हीला सिक्स स्पीड गियरबॉक्स दिला गेला आहे.जगात बाईकवरून फिरण्याची आवड असलेल्या बाईकप्रेमींसाठी या बाईक्स म्हणजे वेगळा नजराणा ठरेल असा कंपनीचा दावा आहे.
केटीएम २५० साठी २४९ सीसी टू स्ट्रोक इंजिन तर केटीएम ३०० साठी २९३.२ सीसीचे टू स्ट्रोक इंजिन दिले गेले आहे. या बाईक्स भारतात कधी येतील हे सांगता येणार नाही असेही समजते.