फेसबुकला फ्रान्स सुरक्षा एजन्सीकडून दीड लाख युरो दंड


सोशल मिडीया क्षेत्रातील नामवंत फेसबुकला फ्रान्सच्या डेटा सुरक्षा एजन्सीने दीड लाख युरो म्हणजे १ कोटी रूपयांचा दंड ठोठावला आहे. फेसबुक युजर्सची माहिती जाहिरातदारांपर्यंत पोहोचण्यास अटकाव करण्यात फेसबुक अपयशी ठरल्याबद्दल हा दंड ठोठावला गेला आहे. मंगळवारी हा दंड ठोठावला गेला आहे मात्र त्यावर फेसबुककडून कोणतीही प्रतिक्रिया दिली गेलेली नाही. तसेच फेसबुककडून वरील संस्थेला कांही उत्तर दिले गेले आहे काय याचाही खुलासा झालेला नाही.

या एजन्सीच्या म्हणण्यानुसार बेल्जियम, नेदरलँड,स्पेन, जर्मनी या देशांत या संदर्भातली विस्तृत तपासणी केल्यानंतर हा दंड ठोठावला गेला आहे. फेसबुक इंक व फेसबुक आयरलंड दोन्हीवर दंडाची कारवाई केली गेली आहे. फेसबुकच्या महसूलाच्या मानाने हा दंड खूपच किरकोळ आहे मात्र आक्र्टो २०१६ पर्यंत या संस्थेला तपासणी दंड अधिक आकारण्याचा अधिकारच दिला गेला नव्हता. त्यानंतर करण्यात आलेल्या नियमानुसार आता ही संस्था ३० लाख यूरोपर्यंत दंड आकारू शकणार आहे. फेसबुकला या संस्थेने यूजरच्या सहमतीशिवाय केले जात असलेले ट्रॅकींग थांबवावे यासाठी पुरेसा वेळ दिला होता मात्र फेसबुकला त्यात यश आलेले नाही.

Leave a Comment