अलिबाबा पाकिस्तानात कारभार सुरू करणार


चिनी दिग्गज कंपनी अलिबाबा पाकिस्तानात त्यांचा व्यवसाय सुरू करणार असून त्यांच्या ई कॉमर्स माध्यमातून लघु व मध्यम उद्योगातील उत्पादने परदेशात विकणार आहे. देशाला जागतिक निर्यातीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी पाकिस्तानने अलिबाबाशी हातमिळविणी केली आहे. मंगळवारी पाकचे वाणिज्य मंत्री खुर्रम दस्तगीर व अलिबाबाचे मायकल इवांस यांच्यात या संदर्भातील करारावर सह्या करण्यात आल्या.

पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी अलिबाबाच्या मुख्यालयाला दिलेल्या भेटीदरम्यान हे करार केले गेले आहेत. यावेळी अलिबाबाचे प्रमुख जॅक मा हेही उपस्थित होते. शरीफ यांनी अलिबाबाच्या सहकार्याबद्दल समाधान मानले असून यामुळे पाकिस्तानी उत्पादनांच्या निर्यातीत वाढ होईल अशी अ्रपेक्षा व्यक्त केली आहे.

Leave a Comment