आपल्या फोर बाय फोर रँग्लर रेंजचा विस्तार करताना जीपने त्यांची लिमिटेड एडीशन नाईट ईगल एसयूव्ही युके मध्ये लाँच केली आहे. यावर्षी ही एसयूव्ही जिनेव्हा येथील ऑटोशो मध्ये सादर केली गेली होती. एकापेक्षा एक मस्त रंगात ती उपलब्ध करून दिली जात आहे.
जीपची लिमिटेड एडीशन नाईट ईगल एसयूव्ही
या एसयूव्हीला २.८ लिटरचे सीआरडी २०० एचपी पॉवर डिझेल इंजिन असून पाच स्पीड अॅटोमॅटिक गियरबॉक्स आहे. ० ते १०० किमीचा वेग ही गाडी १०. ७ सेकंदात घेते व तिचा टॉप स्पीड आहे १७० किमी. जांभळा, निळा, पांढरा व काळा अशा रंगात ती उपलब्ध आहे. तिला बॉडी कलर ग्रिल, हेडलँप रिंग्ज, लेदर रॅप्ड स्टीअरिंग, लेदर सीटस दिल्या गेल्या आहेत. ही गाडी अत्यंत मजबूत आहे. जीपची ही गाडी ऑफरोडिंग एसयूव्ही असून ती देशात तसेच परदेशात खरेदी करणार्यांचा मुख्य हेतू पॉवर व स्टाईल स्टेटमेंट असतो असेही सांगितले जाते. भारतात ही एसयूव्ही साधारण ३३ लाखांपर्यंत मिळेल असेही समजते.