काळ्या पैशाविरोधात ‘क्लीन मनी’


नवी दिल्ली: अर्थमंत्री अरुण जेटलींंच्या हस्ते दिल्लीत ‘क्लीन मनी’ या काळ्या पैशाविरोधातील एका संकेत स्थळाचा शुभारंभ काल करण्यात आला. काळ्या पैशांविरोधात लढा आणखी तीव्र करण्याच्या दृष्टीने केंद्राने हे पाऊल उचलले आहे. या संकेतस्थळावर आयकर विभागाने टाकलेल्या छाप्याची तसेच कर चुकवणार्‍यांची श्रेणीनुसार विभागणी करण्यात येणार आहे. अर्थमंत्री जेटली यांनी ऑपरेशन क्लीन मनी या मोहीमेच्या पुढील टप्प्याची सुरुवात केली.

आयकर विभाग या संकेतस्थळावर त्यांनी टाकलेल्या छाप्यांची माहिती अपलोड करणार आहे. कर चुकवणार्‍यांचा शोध घेण्याची नेमकी पद्धत काय असेल याचा तपशीलही या संकेतस्थळावरही दिला जाणार आहे. यात कर चुकवणार्‍यांची श्रेणीवार विभागणी केली जाणार आहे. जाणतेपणाने करचुकवेगिरी करणार्‍यांची थेट चौकशी करण्याचे किंवा त्यांच्या घरांवर छापा टाकण्याची कारवाई केली जाणार आहे. तर ‘मीडियम रिस्क’ या श्रेणीतील करचुकव्यांना एसएमएस किंवा ईमेलद्वारे उपाययोजना सांगितल्या जातील. तर ‘लो रिस्क’मधील करचुकव्यांवर फक्त नजर ठेवली जाणार आहे.

Leave a Comment