आता टॅटयूही बोलणार


हातावर अथवा शरीराच्या कोणत्याही भागावर टॅटयू गोंदविण्याची पद्धत आता रूळत चालली असतानाच बोलणारे टॅट्यूही अस्तित्वात आले आहेत. सर्वसाधारणपणे आपल्या मनातील गोष्टी किंवा भावना दुसर्‍यांपर्यंत पोहोचविण्यासाठी, एखाद्या प्रसंगाची आठवण, प्रेम व्यक्त करण्यासाठी टॅट्यू काढून घेण्याकडे सर्वसाधारण कल असतो. हे टॅट्यू प्रत्यक्षात बोलले तर ही कल्पना अशक्य वाटत होती मात्र नेट सिगार्ड याने हे शक्य करून दाखविले आहे. त्याच्या गर्लफ्रें डने टॅट्यू बोलले पाहिजेत अशी इच्छा व्यक्त केली होती व नेटने ती पुरी केली.

नेटने यासाठी साऊंड वेव्ह टॅट्यू तयार करून स्क्रीन मोशन अॅपच्या सहाय्याने त्यांना बोलते केले. त्यात एखादे गाणे, एखादे वाक्य, अथवा मनातील एखादी व्यक्त केलेली भावना आपण ऐकू शकतो. त्याने आपले चार महिन्याचे बाळ व पत्नी यांचा आय लव्ह यू म्हणणारा टॅट्यू त्यांच्याच आवाजात तयार केला व त्याचा व्हिडीओ ११ एप्रिल रोजी फेसबुकवर शेअर केला. आत्तापर्यंत हा व्हीडीओ १ कोटी ४० लाख लोकांनी पाहिला आहे.

नेटच्या म्हणण्यानुसार कोणत्याही आवाजाचा टॅट्यू तयार करता येतो. त्यासाठी साऊंड ट्रॅक या टॅट्यूत अतिशय काळजीपूर्वक व सूक्ष्म स्वरूपात घातला जातो व तो अॅपच्या सहाय्याने प्ले केला जातो.

Leave a Comment