अवघ्या ५ हजारात सॅनसुईचा ४जी रस्मार्टफोन !


नवी दिल्ली : खास आपल्या ग्राहकांसाठी प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅनसुईने आपला नवा ४ जी ‘हॉरिजन २’ स्मार्टफोन नुकताच लाँच केला असून अवघ्या ४ हजार ९९९ रुपयांत हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर मिळणार आहे. या स्मार्टफोनमध्ये ५ इंचाचा डिस्प्ले, १.२५GHz क्वार्ड कोर मीडियाटेकचा प्रोसेसर, २ जीबी रॅम, ८ मेगापिक्सलचा रिअर आणि ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा, १६ जीबी इंटरनल स्टोरेज तर ६४ जीबीपर्यंत एक्सपांडेबल स्टोरेज आणि २४५० mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

Leave a Comment