पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त


नवी द्ल्ली: पेट्रोल प्रतिलीटर २.१६ रूपयांनी तर, डिझेलच्या दरात प्रतिलीटर २.१० रूपयांनी घट झाली असून पेट्रोल, डिझेलचे कमी झालेले दर आज मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत. पेट्रोल, डिझेलच्या दरात पाक्षिक बैठकीनंतर कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पेट्रोल, डिझेलच्या दरात यापूर्वी एक मे या दिवशी किरकोळ वाढ करण्यात आली होती. तेव्हा पेट्रोल १ पैसे प्रतिलीटर तर, डिझेल ४४ पैसे प्रतिलीटर या दराने वाढले होते. १६ एप्रिललाही पेट्रोल, किमतीत प्रतिलीटर १.३९ रूपयांनी तर, डीजलच्या किमती प्रतिलीटर १.०४ रूपयांची वाढ करण्या आली होती. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलांच्या किमती घसरल्याने तेल कंपन्यांनी भारतातही पेट्रेल, डिझेलच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, पेट्रोल डिझेलचे दर यापूर्वी भारतीय पेट्रोलियम कंपन्या दर पंधरा दिवसांनी पाक्षिक बैठक घेऊन ठरवत असत. पण, यापूढे सोने, चांदीच्या दराप्रमाणे इंधनाचेही दर विशेषत: पेट्रोल डिझेलचे दर प्रतिदिन ठरवले जातील, असा निर्णय पेट्रोलियम कंपन्यांनी घेतला आहे. पाँडेचरी, विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश), उदयपूर (राजस्थान), जमशेदपूर (झारखंड) आणि चंदीगढ या पाच शहरांमध्ये हा प्रयोग प्रायोगिक तत्वांवर सुरू करण्यात येणार आहे. त्याच्या यशस्वीतेनंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

Leave a Comment