रेल्वेतील लोअर बर्थसाठी मोजावे लागणार जादा पैसे !


नवी दिल्ली : रेल्वेतील लोअर बर्थसाठी आता ५० ते ७५ रुपये तिकिटाशिवाय जादा मोजावे लागण्याची शक्यता असून त्यासाठीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. आधी कमी अंतराच्या ठिकाणी जाण्याच्या तिकिटासाठी जास्त पैसे तर लांबचा प्रवास करण्यासाठी अंतरानुसार पैसे मोजावे लागणार आहे. आता लोअर बर्थसाठी तिकिटाशिवाय अधिकचे ५० रुपये मोजावे लागणार असल्याने याचा फटका सर्वाधिक हा स्त्रिया, गरोदर माता आणि ज्येष्ठ नागरिकांना बसणार आहे. लोअर बर्थसाठी प्राधान्य त्यांनाच देण्यात येते. त्यामुळे हा निर्णय कितपत योग्य आहे, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.

दरम्यान, लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचे तिकिट बुक करताना लोअर बर्थ हवा असल्यास त्यासाठी आता ५० रुपये जास्त मोजण्याची तयारी ठेवा. कारण रेल्वे प्रशासन लवकरच लोअर बर्थसाठी अतिरिक्त वाढीव शुल्क घेण्याकरीता नवे धोरण आणण्याच्या तयारीत आहे. सीटच्या वाढत्या मागणीनुसार त्यावर वाढीव शुल्क आकारण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार आहे.

Leave a Comment