बैलांपासून वीज निर्मितीसाठी पतंजलीत संशोधन


रामदेव बाबांच्या पतंजली उद्योगाने बैलांपासून वीज निर्मिती कशी करता येईल यासाठी गेले दीड वर्षे सुरू ठेवलेल्या संशोधनाला यश मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संशोधनाला प्राथमिक यश मिळाले असल्याचे सांगितले जात आहे. इकॉनॉमिक टाईम्सने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

रामदेवबाबांचे सहकारी बाळकृष्ण यांनी बैलापांसून वीज निर्मितीची कल्पना उचलून धरली व ती प्रत्यक्षात आणण्यासाठी तुर्कस्थानातील एका कंपनीचे सहकार्य घेतले असल्याचे समजते. बैल शेतकर्‍यांसाठीच नाही तर सर्वसामान्यांसाठीही मौल्यवान ठरू शकतात हे सिद्ध करण्यासाठी व बैलांची कसाईखान्यात रवानगी होण्यापासून त्यांचा बचाव करण्यासाठी हे संशोधन हाती घेतले गेल्याचेही समजते. बुल पॉवर म्हणजे बैलांची कांहीही खेचण्याची क्षमता वापरून त्यातून वीज निर्मिती करण्यासंदर्भात हे संशोधन केले जात आहे.

Leave a Comment