टीव्हीएसच्या नव्या स्कूटीचा टिझर रिलीज


भारतातील नामांकीत टू व्हीलर कंपनी टीव्हीएस मोटर्सने त्यांच्या नव्या स्कूटीचा टिझर रिलीज केला असून यात गाडीचा फक्त टेल लँप दाखविला गेला आहे. त्यावरून नवी स्कूटी झेस्ट ११० मॉडेलप्रमाणे असावी असा अंदाज केला जात आहे. अर्थात नव्या स्कूटीच्या दिसण्यात कांही बदल म्हणजेच कॉस्मेटिक बदल केले जात असल्याचे सांगितले जात आहे.

नवीन ग्राफिक्स, डीआरएल, यूएसबी चेंजिग सॉकेट याचा त्यात समावेश असून ही स्कूटी अनेक रंगात उपलब्ध केली जात आहे. झेस्टची कांही फिचर्स या स्कूटीलाही देण्यात येणार आहेत. १०९.७ सीसीचे इंजिन, सीव्हीटी अॅटोमॅटिक गिअरबॉक्स सह ही स्कूटी येईल. या गाडीचे मायलेज मस्त म्हणजे लिटरला ६२ किमी पर्यंत असल्याचेही सांगितले जात आहे.लेटेस्ट हायटेक टेक्नॉलॉजीचा वापर करून बनविलेल्या या गाडीसाठी झेस्ट पेक्षा थोडी अधिक किमत मोजावी लागेल असा अंदाज व्यकत केला जात आहे. झेस्टची किंमत ४६२३८ रूपये आहे.

Leave a Comment