व्हॉट्सअॅपच्या चुकीला २१ कोटींचा दंड


रोम : व्हॉट्सअॅपवर फाल्तूचे जोक्स, देश विघातक माहिती टाकून मोठमोठ्या चुका करणारे आपण अनेकजण पाहिले असतील. पण व्हॉट्सअॅपच्या ग्रुपमध्ये असे मेसेजेस येतील त्या ग्रुपच्या अॅडमिनला अटक केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पण येथे अॅडमिनची चुक नाही तर थेट व्हॉट्सअॅपचीच आहे. व्हॉट्सअॅपला या एका चुकीमुळे २१ कोटींचा दंड बसला आहे. ग्राहक व्हॉट्सअॅपने केलेल्या या चुकीला कधीच माफ करणार नाहीत.

युजर्सची खासगी माहिती व्हॉट्सअॅपने लिक केल्याची गंभीर चुक केली आहे. आपल्या यूजर्सची खासगी माहिती त्यांच्या परवानगीविना फेसबुकशी शेअर करण्यात आली आहे. इटलीतील ‘अँटीट्रस्ट अथॉरिटीज’ने व्हॉट्सअॅपला या फसवणुकीबद्दल ३ दशलक्ष युरो (सुमारे २१ कोटी रुपये) एवढा दंड ठोठावला आहे.

गेल्या वर्षी व्हॉट्सअॅपला युरोपीय संघाच्या २८ सदस्यीय डेटा प्रोटेक्शन अथॉरिटीने ताकीद दिली होती. फेसबुकला आपल्या यूजर्सची माहिती देऊ नका, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले होते. पण या अटीचे उल्लंघन केल्याने कंपनीला २१ कोटी भरावे लागणार आहेत. भारतातही सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी याचिका दाखल करण्यात आली आहे. या माहितीच्या देवाणघेवाणीसंदर्भात ठोस कायदा बनवण्यात येत असल्याची माहिती केंद्र सरकारने न्यायालयात दिली आहे.

मार्क झुकरबर्गच्या फेसबुकने २०१४ मध्ये व्हॉट्सअॅप विकत घेतल्याचे तुम्हाला माहिती असेलच. परंतु हे होत असताना व्हॉट्सअॅप यापुढेही स्वतंत्र कंपनी म्हणूनच काम करेल आणि त्यांच्या यूजर्सची माहिती त्यांच्याकडेच राहील, असे त्यांनी स्पष्ट केल्यामुळे व्हॉट्सअॅप युजर्स निवांत होते. पण त्यानंतर युजर्सच्या तक्रारी येऊ लागल्या त्यामुळे हे प्रकरण समोर आले. २०१६ मध्ये त्यांनी प्रायव्हसी पॉलिसी बदलली. यूजर्सच्या माहितीची देवाणघेवाण सुरू झाली. या डेटा शेअरिंगला संमती न दिल्यास यूजर्सना व्हॉट्सअॅपचा वापरच करता येत नव्हता. काहींनी त्यावर आक्षेप घेतला आणि भारतासह अनेक देशांमध्ये हा विषय न्यायालयात गेला.

Leave a Comment