जिओमुळे आयडियाला ४०० कोटींचा फटका


मुंबई : टेलिकॉम क्षेत्रातील मोठ-मोठ्या कंपन्यांना रिलायन्स जिओच्या आगमनानंतर फटका बसला असून २०१६-१७ च्या चौथ्या तिमाहीत आयडिया सेल्युलर कंपनीला तब्बल ३२८ कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे.

आयडिया सेल्युलरला २०१६-२०१७या आर्थिक वर्षात एकूण ४०० कोटींच्या नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. आयडिया सेल्युलरने २०१५-१६ या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत ४५२ कोटींच्या नफ्याची नोंद केली होती. शिवाय, गेल्या आर्थिक वर्षात आयडिया सेल्युलरचा नफा २ हजार ७२८ कोटी होता.

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या अहवालानुसार, कंपनीच्या महसुलात २०१६-१७ या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत १४.३ टक्क्यांची घट झाली असून, चौथ्या तिमाहीत ८ हजार १२६ कोटींच्या महसुलाची नोंद झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीत ९ हजार ४७८ कोटींच्या महसुलाची नोंद झाली होती.

Leave a Comment