सर्व बँकांना एटीएम सिस्टीम अपडेट करण्याचे निर्देश


मुंबई – सध्या रॅन्समवेअर व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला असून या व्हायरसपासून एटीएम मशीन्सनाही धोका असल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने त्यांच्या एटीएम सिस्टीम अपडेट करण्याचे सर्व बँकांना निर्देश दिले आहेत. शुक्रवारी अचानक झालेल्या सायबर हल्ल्याचा १५० देशातील २ लाख संगणकांना फटका बसला आहे. देशातील २.२५ लाख एटीएमपैकी ७० टक्क्याहून अधिक एटीएममध्ये आऊटडेटेड विंडोज एक्सपी ऑपरेटिंग सिस्टीम आहे.

त्या विक्रेत्यांकडे या सिस्टीमचे नियंत्रण असते जे बँकेला ही सिस्टीम पुरवितात. एटीएम तात्काळ अपडेट करा, तो पर्यंत एटीएममशीन्स वापरु नका असे निर्देश आरबीआयने बँकांना दिल्यामुळे आधीच कॅश नसल्याने खडखडाट असलेल्या एटीएम मशीन्स काही तासांठी बंद राहू शकतात. ग्राहकांची माहिती आणि खात्यातील रोख रक्कमेला कोणताही धोका नसल्याचे एटीएम मशीन्सचे व्यवस्थापन करणा-या कंपनीने सांगितले.

Leave a Comment