
मुंबई – वातावरणात मागील काही दिवसांपासून अचानक होत आहेत, पावसाच्या सरी उन्हाळ्यातही बरसणे आणि गरमीचा अनुभव येणे सुरूच आहे. त्यातच माणसाच्या कायम सोबत असलेली सावलीही आज सोमवारी त्याच्यापासून काळी वेळासाठी लुप्त झाली होती. जेव्हा सूर्यबरोबर डोक्यावर दुपारी १२ वाजून ३४ मिनिटे ते १२ वाजून ४६ मिनिटांदरम्यान शून्य सावलीचा अनेकांनी अनुभव घेतला असल्याची माहिती मुंबईच्या नेहरू तारांगणचे संचालक अरविंद परांजपे यांनी दिली आहे.
मुंबईकरांनी अनुभवला शून्य सावली दिन
हे वातावरणात सतत होणा-या बदलांमुळेच शक्य झाले असून वातावरणातील अनाकलनीय बदल हा दिवसेंदिवस विध्वंसाकडे घेऊन जात आहे. ठरावीक काळानंतर पडणारा दुष्काळ, शहरासह देशभरात वाढत जाणारे तापमान आणि मोठ्या प्रमाणातील प्रदूषणसुद्धा येऊ घातलेल्या विध्वंसकतेला तितकेच कारणीभूत असल्याची माहिती मुंबई वेधशाळेचे उपसंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे.
