एव्हरेस्टच्या साक्षीने बांधली लग्नगाठ


कॅलिफोनिर्यात राहणारे जेम्स सिमॉन(वय ३५) व अॅशले स्मिडर (वय ३२) सध्या सोशल मिडीयावर जोरदार चर्चेत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे आपले लग्न संस्मरणीय व्हावे या इच्छेतून त्यांनी चक्क माऊंट एव्हरेस्टवर लग्नगाठ बांधली आहे. या लग्नाच्या तयारीचे आणि लग्नाचे फोटो काढण्यासाठी फोटोग्राफर म्हणून चार्लेटन चर्चिल यांना नेमले गेले होते व तेही वधूवरासह या आगळ्या लग्नसोहळ्यासाठी चक्क १४ हजार फूट शिखरावर चढून गेले तेही आपल्या सर्व साधनसामग्रीसह.

लग्नाच्या तयारीसाठी जेम्स व अॅशले याना तीन आठवडे लागले. त्यांनी एव्हरेटवर जाऊन लग्न केले व त्याचे फोटो काढले. पारंपारिक पद्धतीने त्यांना लग्न करायचे नव्हते व आपले लग्न लोकांच्याही स्मरणात राहावे अशी त्यांची मनीषा होती. त्यासाठी ते दोघे १ वर्ष प्लॅनिंग करत होते. तेथील अनुभवाविषयी जेम्स सांगतो, थंडी मरणाची होती. आम्हाला स्वतःला गरम ठेवण्यासाठी खास प्रयत्न करावे लागत होते. गरम सूप, गरम खाणे, खूप चालणे, सतत हालचाल करणे यातून शरीर गरम ठेवण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र बर्फाने घेरलेल्या एव्हरेस्टच्या नयनमनोहर पार्श्वभूमीवर एकमेकांचा हात हातात घेऊन विवाहबंधनात अडकणे याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. लग्न लागल्यानंतर तेथील सामान पॅक करायला दीड तास लागला कारण थंडीमुळे हात भरभर हलत नव्हते असेही जेम्स म्हणाला.

Leave a Comment