पेट्रोल पंप चालकांचे सुट्टी आंदोलन मागे


मुंबई – पेट्रोल पंप चालकांनी दर रविवारी सुट्टी जाण्याचा निर्णय मागे घेतल्यामुळे उद्या रविवारी पेट्रोल पंप सुरू राहणार आहे.

पेट्रोल पंपधारकांच्या संघटनेने पेट्रोल पंपांवर विकण्यात येणाऱ्या इंधनावरील कमिशनमध्ये मोठी वाढ देण्यासाठी सातत्याने टाळाटाळ करणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी दर रविवारी सुट्टीवर जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे उद्या १४ मे पासून प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार अशी घोषणा या संघटनेने केली होती. मात्र, ऑईल कंपन्यांनी आज या पेट्रोल पंप चालकांच्या प्रतिनिधीसाठी चर्चेला बोलावण्यात आल्यामुळे पेट्रोल पंपचालकांनी उद्याचे नियोजित आंदोलन मागे घेतले आहे.

Leave a Comment