राणेंच्या वॅक्स म्युझियममध्ये चक्क नरेंद्र मोदींचा पुतळा


ओरोस : पंतप्रधान नरेंद्र मोदींची क्रेज आता सिंधुदुर्गातही दिसून येणार असून मोदी चक्क राणेंच्या वॅक्स म्युझियममध्ये दिसणार आहेत. सिंधुदुर्गातील देवगडमध्ये काँग्रेसचे आमदार नितेश राणेंच्या संकल्पनेतील वॅक्स म्युझियम साकारण्यास सुरूवात झाली आहे. पण या म्युझियममध्ये सध्या फक्त नरेंद्र मोदींचाच पुतळा आला आहे. काँग्रेसमधील दिवंगत नेत्यांमध्ये इंदिरा आणि राजीव गांधींचे पुतळे लागले आहेत. या सगळ्या आजी माजी दिग्गजांच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुतळा या वॅक्स म्युझियममध्ये लागल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

Leave a Comment