‘गो-एअर’ने करा केवळ ५९९ रुपयांत करा विमान प्रवास


नवी दिल्ली – मान्सून कँपेनच्या माध्यमातून देशांतर्गत हवाई वाहतूक करणारी विमान सेवा कंपनी गो-एअरने स्वस्त दरातील विमान प्रवासाची घोषणा केली आहे. यामध्ये मूळ भाडे ५९९ रुपयांपासून सुरू होईल आणि कर तथा सेवा शुल्क अतिरिक्त द्यावे लागतील. याबाबत माहिती देताना गो एअरलाइनने सांगितले आहे की, या ऑफरनुसार ०१ जुलै ते ३० सप्टेंबर दरम्यानच्या हवाई प्रवासासाठी १२ मे ते १५ मे २०१७ पर्यंत तिकीट बुक करावे लागणार आहे. ही ऑफर या कंपनीच्या सर्व २३ मार्गांवर नॉन-स्टॉप आणि स्टॉप हवाईप्रवासासाठी उपलब्ध आहे.

हवाई प्रवासाची सवलतीच्या दरात सुविधा देणाऱ्या एअरलाइन गो-एअरने डोमॅस्टिक मार्गावर मान्सून ऑफर सादर केली आहे. या ऑफरनुसार केवळ ५९९ रुपयांत हवाई प्रवासाचा आनंद लोक घेऊ शकतात. या ऑफरच्या माध्यमातून खरेदी केलेली तिकीट नॉन रिफंडेबल असेल. म्हणजे तिकीट रद्द केल्यानंतर तिकीटाचे पैसे परत मिळणार नाहीत. गो-एअरची ही ऑफर मोजक्याच फेअर टाइप आणि मोजक्याच सीट्सवर उपलब्ध असेल. ऑफरच्या माध्यमातून ग्रुप डिस्काउंट मिळणार नाही त्याचबरोबर कोणत्याही अन्य प्रमोशनल ऑफर्सबरोबर जोडले जाऊ शकणार नाही.

नोव्हेंबर २००५ मध्ये एअरलाईन सुरू करणाऱ्या गो-एअर कंपनीने देशभरातील २३ मार्गावर या ऑफरची घोषणा केली आहे. या ऑफरच्या माध्यमातून अहमदाबाद, बंगळुरू, भुवनेश्‍वर, चंडीगड, चेन्‍नई, दिल्‍ली, गोवा, गुवाहाटी, जयपूर, जम्‍मू, कोच्ची, कोलकाता, लेह, लखनौ, मुंबई, नागपूर, पाटणा, पोर्ट ब्‍लेयर, पुणे, रांची, श्रीनगर आणि हैदराबाद मार्गावर स्वस्त दरात हवाई प्रवास केला जाऊ शकतो.

Leave a Comment