वीज चोरी विरोधातले एक महत्त्वाचे हत्यार ठरणारे इलेट्रिक स्मार्ट मीटर लवकरच भारतात येत असल्याचे वीज कोळसा खाण मंत्री पियुष गोयल यांनी लंडन स्टॉक एक्स्चेंजमध्ये झालेल्या ग्रेट ब्रिटन गुंतवणूक दार बैठकीत स्पष्ट केले. ते म्हणाले, एलईडी बल्ब सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणल्यानंतर आता देशवासियांना स्मार्ट मीटर देणे हे सरकारचे पुढचे लक्ष्य आहे. पुढच्या ४-५ वर्षात २५ कोटी स्मार्ट मीटर बनविणे, अथवा खरेदी करण्याची प्रक्रिया राबविली जात असून त्यामुळे देशात स्मार्टमीटरचे मोठे मार्केट खुले होत आहे.
लवकरच येणार स्मार्ट मीटर
या मार्केटमध्ये अब्जावधीची गुंतवणूक होणार आहे व परदेशी गुंतवणूकदार भारतात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत त्यांच्यासाठी ही मोठी संधी असेल. ३ वर्षांच्या आत भारत सरकारने एलईडी बल्बच्या किंमती ८५ टक्यांनी कमी केल्या त्याचप्रमाणे स्मार्टमीटरही १ हजार रूपयांत दिले जाणार आहेत. असे किमान २५ कोटी स्मार्ट मीटर लागणार आहेत व सरकार प्रत्येक घरासाठी स्मार्ट मीटर ही योजना राबविणार आहे. गरीब कुटुंबांना त्यासाठी सबसिडी दिली जाईल तर मध्यमवर्गीय कुटुंबे दर महा १०० रूपये भाडे भरून हे मीटर वापरू शकतील.