यूपीएससी पास केलेल्यांना खासगी नोकरीतही संधी मिळणार


यूपीएससीच्या लेखी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्यांना मात्र मुलाखतीत यशस्वी होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी आता खासगी नोकर्‍यांची द्वारे खुली होणार आहेत. यामुळे यूपीएससी पास झालेल्यांना सरकारी नाही तरी खासगी नोकर्रीची संधी मिळणार आहे. यूपीएससीने उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे गुण व शैक्षणिक योग्यता असलेला डेटा ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी कंपन्यांसाठी हा डेटा मोठा उपयुक्त ठरणार असून यातील उमेदवारांची कंपन्या त्यांच्या गरजेनुसार निवड करू शकणार आहेत.

यूपीएससीच्या या निर्णयामुळे देशभरात नोकरी योग्य उमेदवारांची डेटा बँक तयार होऊ शकते आहे. हा डेटा पब्लिक रिक्रुमेंट एजन्सीसाठी नॅशनल इंर्फोमेटिक्स सेंटरकडून तयार केल्या गेलेल्या इंटिग्रेडेट इन्र्फोमेटिक सिस्टीमशी लिंक होणार आहे. अर्थात विद्यार्थ्यांचा गुणवत्ता डेटा ऑनलाईन करण्यापूर्वी संबंधित विद्यार्थ्यांची खासगी नोकरीची तयारी आहे का नाही याचे तसेच माहिती ऑनलाईन देण्यासाठी मान्यता असल्याचे जाणून घेतले जाणार असल्याचे स्पष्ट केले गेले आहे.

Leave a Comment