कार्बनचा मिडरेंज ऑरा फोर जी लाँच


कार्बनने त्यांचा मिडरेंज फोर जी व्होल्ट स्मार्टफोन भारतात लाँच केला असून तो ऑरा फोरजी नावाने लाँच झाला आहे. दोन कलर व्हेरिएंटमध्ये तो उपलब्ध असून त्याची किंमत आहे ५२९० रूपये. ब्ल्यू शँपेन व कॉफी शँपेन या दोन रंगात तो उपलब्ध आहे.

या फोनला ५ इंची एचडी डिस्प्ले, अँड्राईड मार्शमेलो ६.० ओएस, १ जीबी रॅम, ८ जीबी इंटरनल मेमरी ती कार्डच्या सहाय्याने ३२ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, एलईडी फ्लॅशसह ८ एमपीचा रियर व पाच एमपीचा सेल्फी कॅमेरा दिले गेले आहेत. कनेक्टिव्हीटीसाठी फोरजी व्होल्ट, ब्ल्यू टूथ,वायफाय, मायक्रो यूएसबी, जीपीएस अशी ऑप्शन्स अ्राहेत. फोनला २१५० एमएएच ची बॅटरी दिली गेली आहे.

Leave a Comment