बंगळूरूमध्ये सुरु झाले शाओमीचे पहिले स्टोअर


बंगळूरू – बंगळूरूमध्ये ‘एमआय होम’ या नावाने शाओमी या चिनी स्मार्टफोन कंपनीने स्टोअर सुरू केले असून कंपनीचे हे देशातील पहिलेचे स्टोअर असून ग्राहकांना ऑफलाईन रिटेल स्टोअरचा आनंद घेता येईल. एमआय आणि रेडमी सीरिजमधील स्मार्टफोन या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध असतील. याचप्रमाणे कंपनीच्या अन्य इलेक्ट्रॉनिक उप्तादनांचाही समावेश असणार आहे.

अशी १०० स्टोअर संपूर्ण देशभरात सुरू करण्याची कंपनीची संकल्पना आहे. मुंबई, दिल्ली, हैदराबाद आणि चेन्नईमध्ये लवकरच स्टोअर सुरू करण्यात येतील. या ठिकाणी भारतात विक्री करण्यात येणारी उत्पादने उपलब्ध असतील. याचठिकाणी एक्सपिरिअन्स झोन सुरू करून देशात विक्री न होणारी उत्पादने ठेवण्यात येतील. कंपनी भारतात टीव्ही, जलशुद्धीकरण यंत्र आणि इलेक्ट्रिक बाईकची विक्री करत नाही. देशात विक्री न होणाऱया उत्पादनांचा प्रतिसाद कंपनीला या माध्यमातून मिळेल.

Leave a Comment