आता इमोजीपासून बनवा सोपा आणि सुरक्षित पासवर्ड


पासवर्ड हा आपल्या फोनसाठी किती अत्यावश्यक असतो हे काही वेगळे सांगायला नको. बऱ्याचदा आपण पासवर्डच विसरतो. फक्त मोबाइलचा पासवर्ड छोटा असतो. पण सोशल मीडियावरचे अकाऊंट, मेलचे वेगळे अकाऊंट, सगळीकडे भलेमोठे पासवर्ड टाकवे लागतात. तेव्हा प्रत्येकवेळी पासवर्ड टाकायचा त्यातून तो लक्षात ठेवायचा म्हणजे सगळ्यात कठीण काम. पण आता लवकरच यापासून तुमची सुटका होऊ शकते. कारण नवी लॉगिन सिस्टम टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ बर्लिनचे अभ्यासक तयार करत असून जी इमोजीवर चालेल. तुम्हाला मोबाईलचा पासवर्ड अंकांऐवजी एखादा इमोजी पासवर्ड म्हणून टाकावा लागणार आहे.

आता आपल्या रोजच्या वापरतात इमोजी अनेकदा येतात. आपल्या मोबाईल संभाषणात तर आपण इमोजीच जास्त वापरतो. मोबाईलवरचा संवाद इमोजीमुळे अधिक चांगल्याप्रकारे होतो असेही एका संशोधनातून समोर आले आहे. समोरच्या व्यक्तीच्या मनात काय सुरू आहे किंवा त्यांच्या बोलण्याचा रोख इमोजी वापरले की सहज कळून येतो. तेव्हा या इमोजींना युजर्सची खूपच पसंती आहे. नवीन पासवर्ड सिस्टिम आता हाच फंडा वापरत विकसित करण्यात येणार आहे. याद्वारे मोबाईल युजर्स सांख्यिक पासवर्डऐवजी इमोजीचा पासवर्ड म्हणून वापर करू शकतात. यात हजारो प्रकारचे इमोजी उपलब्ध आहे तेव्हा युजर्सना आपल्या आवडीचे कोणतेही इमोजी निवडून त्याचा पासवर्ड तयार करता येऊ शकतो.

Leave a Comment