मायक्रोमॅक्सचा कॅनव्हास टू १ वर्ष मोफत फोरजी सह लाँच


मायक्रोमॅक्स कंपनीने त्यांचा नवा कॅनव्हास टू स्मार्टफोन २०१७, एअरटेलच्या भागीदारीसह गुरूवारी लाँच केला आहे. या बजेट फोनसाठी कॉर्निंग गोरील्ला ग्लास प्रोटेक्शन दिले असून इतक्या कमी किमंतीच्या फोनसाठी हे फिचर देणारा कॅनव्हास टू हा पहिलाच फोन आहे. या फोनसोबत १ वर्षाचे मोफत कॉलींग व फोरजी डेटा मिळणार आहे. त्यासाठी कंपनीने एअरटेलशी भागीदारी केली आहे.

कंपनीचे संस्थापक राहुल शर्मा म्हणाले, एअरटेलच्या भागीदारीमुळेच हा चांगल्या दर्जाचा फोन स्वस्त किंमतीत देणे आम्हाला शक्य झाले आहे. फोनची किंमत ११९९९ रूपये आहे. अन्य फिचर्समध्ये ३जीबी रॅम, १६ जीबीची इंटरनल मेमरी ती मायक्रो कार्डच्या सहाय्याने ६४ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, १३ एमपीचा रियर तर ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा, फिंगरप्रिंट सेन्सर, ३०५० एमएएच बॅटरी व अँड्राईड नगेट ओएस यांचा समावेश आहे.

Leave a Comment