चिनी जोडप्यांवर अतुल्य भारताची मोहिनी


सध्या लग्नाच्या आधी प्रीवेडिंग करण्याची कल्पना जोडप्यांमध्ये खूपच हिट होत चालली असून त्यातूनही खर्च करण्याची क्षमता असेल तर अनेकजण फोटोशूटसाठी भारताबाहेरच गेल्याचे तुम्ही पाहिले किंवा ऐकले असेल पण चक्क फोटोशूट करण्यासाठी एक जोडपे चीनमधून भारतात आले आहे. आपला देश लिंग आणि झँगना एवढा आवडला की त्यांनी भारतातच येऊन लग्नाच्या दहाव्या वाढदिवसाचे फोटो काढण्याचे वेड त्यांना स्वस्थ बसू देईना.

या दोघांना ना हिंदी समजते ना इंग्रजी बोलता येते. मात्र तरीसुद्धा या दोघांनी भारत गाठले. याआधी सोशल मीडियावर लिंगने भारतीय जोडप्यांचे फोटो पाहिले होते. लिंगला ताजमहाल, राजस्थानमधील किल्ले, समुद्र किनाऱ्यावर काढलेले फोटो एवढे आवडले की भारतीय पद्धतीचा पेहराव आपणही करून फोटो काढण्याचा हट्ट तिने धरला, त्यानंतर या दोघांनीही थेट भारत गाठला. त्यांनी येथील एका छायाचित्रकाराकडून आपले खास फोटोशूट करून घेतले. पण फोटो काढून घेणे त्यांच्यासाठी आणि छायाचित्रकारासाठी सोप्पी गोष्ट मुळीच नव्हती. कारण छायाचित्रकारांना चिनी भाषा येत नव्हती आणि या जोडप्यांना इंग्रजी येत नव्हती. तेव्हा त्यांना काय सांगायचे हेच कळत नव्हते. मात्र तरीही या जोडप्यांचे फोटो खूप सुंदर आले. दिल्लीची हातरिक्षा असो की राजस्थानचा किल्ला किंवा चिखलाने माखलेला रस्ता असो या प्रत्येक ठिकाणी भेट देत या दोघांनी भारतात आपले फोटो काढण्याची हौस पूर्ण करून घेतली. तेही भारतीय पद्धतीचा पारंपरिक पेहराव घालून हे विशेष.

Leave a Comment