इसुझूची नवीन कार लाँच


नवी दिल्ली: आपली नवीन प्रिमियम कार घेऊन जपानची प्रसिद्ध कार बनवणारी कंपनी इसुझू आली असून इसुझू एमयू-एक्स या कारला आज भारतात लाँच करण्यात आले आहे. सध्या तरी या कारचे डीजल वेरिएंट लाँच करण्यात आले असून कंपनीने या गाडीमध्ये अनेक जबरदस्त फिचर्स दिल्याची चर्चा ऑटोमोबाईल इंडस्ट्रीत आहे.

३.० लीटरचे डीजल इंजन इसुझू एमयू-एक्स या कारला देण्यात आले आहे. ज्याची ताकत १७४ एचपी आहे आणि त्याला ३८० एनएमचे टॉर्क आहे. या गाडीला असणारे इंजन टर्बोचार्ज असणार आहे. यात ५ स्पीड मॅन्युअस ट्रान्समिशन आहे. कारमध्ये ऑल व्हील ड्राईव्ह फिचर देखील असणार आहे. मायलेजचा विचार केला तर ही गाडी एका लीटरला १३.२ पर किलोमीटरचे मायलेज देणार आहे.

सुरक्षिततेसाठी कारमध्ये विशेष काळजी घेण्यात आली आहे. यात ड्युअल एयरबॅग्स आणि ऍन्टी लॉक ब्रेकिंग सिस्टिम दिली गेली आहे. यासोबतच ईबीडी, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, ट्रॅक्सन कन्ट्रोल, हिल स्टार्ट असिस्ट यासारखे अनेक फिचर्स दिले गेले आहेत. तसेच ऍन्टी थेप्ट आणि रिवर्स पार्किंगसाठी मदत करणारा कॅमेरा आणि सेंसर दिला गेला आहे.

इसुझू एमयू-एक्स ही एक 7 सिटर एसयूवी आहे. यात १७ इंचाची डायमंड कट एलॉए, प्रोजेक्टर एलईडी डीआरएल्स हँडलॅम्प्स आहे. त्याचबरोबर ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, ७ इंचाची टचस्क्रिन इन्फोटेन्मेंट सिस्टम आहे. ज्यात यूएसबी एयुएक्स, रेडियो आणि ब्ल्युटूथ सारखे कनेक्टिव्हिटी फिचर्स आहेत. यासोबत यात १० स्पीकर सिस्टिमचा लाईव्ह सराउंड सिस्टिम आहे.

या कारची किंमत २३ लाख ते २५ लाखांच्या दरम्यान असणार आहे. बेस वेरिएन्टची किंमत २३.९९ असणार आहेत तर ऑल व्हिल ड्राईव्ह ४बाय४ वेरिएन्टची किंमत दिल्ली एक्स शोरुममध्ये २५.९९ लाख रुपये असणार आहे. या कारची स्पर्धा टोयोटाच्या फोर्च्युनर आणि होंडा बी-आरव्ही या कारशी असणार आहे.

Leave a Comment