जिओनी आणत आहे ४ कॅमेरेवाला फोन!


लवकरच आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन जिओनी कंपनी लाँच करणार असून या फोनमध्ये ४ कॅमेरे असल्याची माहिती समोर येत आहे. एस ९ स्मार्टफोनचे अपग्रेड वर्जन हा स्मार्टफोन असणार असून ज्याचे नाव जिओनी एस १० असणार आहे.

या स्मार्टफोनचे फोटो चीनची सोशल नेटवर्किंग साईट वीबोने जाहीर केले आहेत. यात एस १०चा ड्युअल कॅमेरा दिसत आहे. जो फोनच्या दोन्ही पॅनलवर आहे. याआधी त्याला टीनावर लिस्ट केले गेले होते. जुन्या लिस्टिंगनुसार रिअर कॅमे-याला १३ मेगापिक्सेलचे दोन सेंसर असणार आहे. पहिला असा दावा करण्यात आला होता की फ्रंट पॅनलवर फक्त एका जागी १६ मेगापिक्सेलचा सेंसर असणार आहे.

याबाबत मोबाईल एक्सपोजरच्या रिपोर्टमध्ये म्हटले गेले आहे की ड्युअल फ्रंट कॅमेरा सेटअपमध्ये २० मेगापिक्सल सोबत ८ मेगापिक्सलचा कॅमेरा असणार, तर रिअरमध्ये १६ मेगापिक्सलचा एक कॅमेरा तर ८ मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा असणार. ड्युअल कॅमेरा सेटअप बाबत केले गेलेले दावे हे फ्रंट कॅमे-यासाठी खरे होऊ शकतात. याचा अर्थ असा की फ्रंट कॅमेरा हा एक तर २० मेगापिक्सल सोबत ८ मेगापिक्सल असणार किंवा १६ मेगापिक्सल सोबत ८ मेगापिक्सल कॅमेरा असणार आहे.

जुन्या रिपोर्ट नुसार जिओनी एस १० हा एन्ड्राईड ७.० नुगाटवर चालणार आहे. यात ५.५ इंचचा फुल एचडी डिस्प्ले असणार आहे. तर याचे रिझोल्यूशन १०८०*१९२० असणार आहे. प्रोसेसर २ गिगाहर्ट्ज मीडियाटेक ६७५५ ऑक्टाकोर पोसेसर आहे. तर ४ जीबी रॅम असणार आहे. इंटरनल मेमरी ६४ जीबी आहे, तर ती १२८ जीबी पर्यंत मायक्रोएसडी कार्डपर्यंत सपोर्ट करणार आहे.

Leave a Comment