नवी दिल्ली: एअरटेल ग्राहकांना आता कॅब बुकिंगसाठी त्यांच्या एअरटेल मोबाईलचा वापर करता येणार असून एअरटेल आता तुम्हाला वेगवेगळ्या डिजिटल सेवा देणार आहेत. यासाठी ओला सोबत एअरटेलने टायअप केले आहे. यातून एअरटेल ग्राहक आता ओलाचे पेमेंट आता एअरटेल पेमेंट बँक मधून करता येणार असल्यामुळे एअरटेल ग्राहकांना आता सोबत कॅश ठेवण्याची गरज भासणार नाही.
एअरटेलची ओला सोबत हातमिळवणी
ओला कंपनीच्या अॅपसोबत ही सेवा देण्यासाठी एअरटेल कंपनी ताळमेळ जुळवणार आहे. तर दुसरीकडे ओला कंपनी ही मायएअरटेल अॅप आणि एअरटेलची वेबसाईटसोबत ताळमेळ जोडेल. त्यातून ही सेवा तुम्हाला मिळणार आहे. यासोबतच तुम्ही ओला मनीचा वापर एअरटेलचा मोबाईल आणि डीटीएच रिचार्ज करण्यासाठीही करता येणार आहे.