आयफोन फाईव्ह एस १५ हजारात मिळणार


आयफोनची खरेदी करण्याचे स्वप्न पाहात असलेल्या आयफोन प्रेमींसाठी एक चांगली बातमी आली आहे. येत्या कांही दिवसांत अॅपल त्यांच्या आयफोन फाईव्ह एस स्मार्टफोनच्या किंमती कमी करत असून हे फोन ग्राहकाला १५ हजारांत मिळू शकणार आहेत. सध्या भारतीय बाजारात या फोनच्या किमती १८ हजार आहेत.

अॅपलने दिवाळीपर्यंत भारतात त्यांची ऑनलाईन स्टोअर्स सुरू करण्याची योजना यापूर्वीच जाहीर केली आहे. भारतीय बाजारपेठेवर आपली पकड मजबूत करण्याच्या प्रयत्नात अॅपल आहे. त्यामुळेच चार वर्षांपूर्वीच सादर झालेल्या आयफोन फाईव्ह एसच्या किंमती घटविल्या जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार रिटेलर्सना अॅपलकडून सप्लाय कमी केला जात असल्याची सूचनाही केली गेली आहे कारण अॅपल त्यांच्या फोनची ऑनलाईन विक्री करणार आहे त्यात सुरवातीला आयफोन एसईची विक्री सुरू केली जाणार आहे. एसईच्या किंमतीही २० हजारांवर आणल्या जात असल्याचे समजते. फाईव्ह एस भारतात आजही लोकप्रिय आहे कारण त्याचा साईज अतिशय योग्य आहे.

Leave a Comment