गुगलचा हा स्मार्टफोन तब्बल १३,००० रुपयांनी स्वस्त


मुंबई – गुगल पिक्सेल किंवा पिक्सेल XL या स्मार्टफोन्सवर गुगलने तब्बल १३ हजार रुपयांची कॅश बॅक ऑफर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. गुगलच्या गुगल पिक्सेल आणि पिक्सेल XL या दोन्ही स्मार्टफोनवर उपलब्ध करुन देण्यात आलेली ही ऑफर ऑनलाईन तसेच ऑफलाईन फोन खरेदीवर देखील लागू असणार आहे. तुम्ही या ऑफरचा लाभ कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेचे डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड वापरुन घेऊ शकाल. खरेदीनंतर ९० दिवसांच्या आत हे पैसे ग्राहकाच्या खात्यात जमा होणार आहेत.

गुगलचा गुगल पिक्सेल स्मार्टफोनमध्ये एक ३२ जीबी आणि दुसरा स्मार्टफोन १२८ जीबीचा उपलब्ध आहे. ३२जीबी मेमरीच्या स्मार्टफोनची किंमत ५७ हजार आहे. तर १२८ जीबी मेमरी असलेल्या स्मार्टफोनची किंमत ६६ हजार रुपये ऐवढी आहे. तर, गुगलच्या पिक्सेल XL स्मार्टफोनच्या ३२ जीबी मेमरी असलेल्या स्मार्टफोनची किंमत ६७ हजार आहे. तसेच १२८ जीबी मेमरी असलेल्या स्मार्टफोनची किंमत ७६ हजार असून या स्मार्टफोन्सवर आता तब्बल १३ हजार रुपयांची कॅश बॅक ऑफर देण्यात आल्याने तुमचे १३ हजार रुपये नक्कीच वाचणार आहेत.

गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात गुगल पिक्सल स्मार्टफोन्स भारतामध्ये लाँन्च करण्यात आले होते. पिक्सलमध्ये ५ इंच फुल एचडी AMOLED डिस्प्ले, २७७० mAh पावर असलेली बॅटरी आहे. तसेच ८ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आणि १२ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. या कॅमेरामध्ये सोनी कंपनीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.

Leave a Comment