नवी दिल्ली – मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाला आता सहा महिने पूर्ण झाले असून एटीएम समोरच्या रांगा काही झालेल्या दिसत नाहीत. सरकारने दोन महिन्यात परिस्थिती पूर्वपदावर येण्याचे आश्वासन दिल्यानंतर जनतेने त्रास सहन केला. पण आजही देशातील अनेक शहरांमधील एटीएममध्ये पैसे नाहीत. नागरिक एटीएममध्ये पैसे नसल्याने त्रस्त होत आहेत. जसे पैसे येतील तसे एटीएममध्ये भरणा करण्यात येत असल्याचे मुख्य बँकांकडून सांगत येत आहे. मात्र, नोटाबंदीमुळे पैशांची मागणी वाढल्यामुळे चलनकल्लोळ जाणवत आहे.
देशभरात सध्या एकच प्रश्न विचारला जात आहे… पण काय
८ नोव्हेंबर २०१६ रोजी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. यावेळी भारतीय चलनात ८६.९ टक्के नोटा वापरात होत्या. यामुळे एटीएममधून पैसे काढण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या. ही परिस्थिती अजूनही तशीच असून एटीएममध्ये पैसे आहेत का? हाच प्रश्न देशातील नागरिक एकमेकांना विचारत आहेत. नागरिकांना कट्टपाने बाहुबली का मारले या प्रश्नाप्रमाणेच हा प्रश्न सतावत आहे.