एचडीएफसी, आयसीआयसीआयचे गृहकर्ज स्वस्त


मुंबई- महिलांसाठी ७५ लाखांपर्यंतच्या कर्जावर खासगी क्षेत्रातील बँका एचडीएफसी आणि आयसीआयसीआयने ८.६५ टक्के व्याजदराची घोषणा केली असून ८.७ टक्के व्याजदर साधारण वर्गासाठी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

स्टेट बँकेने व्याजदर कमी केल्यानंतर अन्य व्यापारी बँकांनीही या निर्णयाचा कित्ता गिरवण्यास सुरवात केली आहे. गृहकर्जावरील व्याजदरकपातीचा लाभ ३० लाख रुपयांपर्यंत कर्ज घेणाऱ्या कर्जदारांना होणार आहे; तर ३० लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज घेणाऱ्यांना या व्याजदरकपातीमुळे ०.१० टक्‍क्‍यांपर्यंत फायदा मिळणार आहे. गृहनिर्माण क्षेत्रावर मंदीचे सावट आहे. जागतिक मंदी, गृहकर्जाचे वाढलेले व्याजदर आणि अलीकडच्या काळातील नोटाबंदी यामुळे हे क्षेत्र अद्यापही मंदीच्या गर्तेतच अडकलेले आहे. मात्र बॅंकांनी गृहकर्जाचे व्याजदर कमी केल्यास या क्षेत्रात सकारात्मक वातावरण तयार होण्यास मदत होईल.

Leave a Comment