वन प्लस फाईव्ह ८ जीबी रॅमसह येणार


द व्हर्ज वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार वन प्लस फाईव्ह याच उन्हाळ्यात बाजारात दाखल केला जात आहे. फ्लॅगशीप फोन वन प्लस थ्री व थ्री टी नंतर बाजारात आणल्या जात असलेल्या या स्मार्टफोनची फिचर्स अद्याप जाहीर केली गेलेली नसली तरी त्याची कांही फिचर्स लीक झाली आहेत. त्यानुसार आत्तापर्यंत कंपनीने त्यांच्या फोनसाठी फुल एचडी स्क्रीन दिला होता त्याऐवजी त्याच्यापेक्षा सुपर क्यूएचडी स्क्रीन या फोनला दिला जाईल.

वन प्लस फाईव्ह आठ जीबी रॅमसह सादर केला जाईल असेही सांगितले जात आहे. आत्तापर्यंत कंपनीने चार जीबी रॅम पर्यंतचे फोन सादर करण्यावर भर दिला होता व वन प्लस सिक्स जीबीचे अपग्रेडेश करून ८ जीबी रॅम दिली जाईल. या फोनला ड्युल कॅमेरा सेट आहे. २३ एमपीचा कॅमेरा सेन्सर सह असेल व त्यामुळे पिक्चर क्वालिटी सर्वात उत्तम असणार आहे. स्नॅपड्रॅगन ८३५ प्रोसेसर, ३५०० एमएएच बॅटरी, डॅश चार्जिंग टेक्नॉलॉजीसह असेल यामुळे फोनचा चार्जिंग टाईम घटेल. अँड्राईड ७.१.२ गटेट अॅड्राईड ओ सह दिली जाणार आहे.

Leave a Comment