भारत जगातील दुचाकीचा सर्वात मोठा बाजार


गतवर्षी दुचाकी बाजारात अव्वल ठरलेल्या चीनला मागे टाकत यंदा भारताने जगातील सर्वात मोठा दुचाकी बाजार बनण्यात यश मिळविले आहे. गतवर्षी भारतात १ कोटी ७७ लाख दुचाकी विकल्या गेल्या आहेत. म्हणजेच दररोज सरासरी ४८ हजार दुचाकींची विक्री झाली आहे.

या संदर्भात सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबिल मॅन्यूफॅक्चरर्स ने अहवाल सादर केला आहे. चीनच्या चायना असो.ऑफ ऑटोमोबिल मॅन्यूफॅक्चरर्सच्या अहवालात गतवर्षात चीनमध्ये १ कोटी ६८ लाख दुचाकींची विक्री झाली होती. इंडियन ऑटेा मॅन्यू.चे डीजी सुगतो सेन यांनी दिलेल्या माहितीनुसार कांही वर्षापूर्वी चीन २५ दशलक्ष डॉलर्सची उलाढाल करून दुचाकी विक्रीत आघाडीवर होता मात्र त्यानंतर त्यांचा हा स्तर खालावला आहे. आजही चीन इलेक्ट्रीक दुचाकींत प्रथम क्रमांकावर आहे. मात्र भारतात स्कूटर विक्रीत वेगाने वाढ झाली आहे.

भारतातील स्कूटर विक्रीतील वेगामागे महिला नोकरदारांची वाढती संख्या, गिअरलेस गाड्यांना ज्येष्ठ व्यक्ती आणि विद्यार्थीवर्गाकडून दिले जात असलेले प्राधान्य, महिलांच्या कमाईत होत असलेली वाढ व त्यासाठी प्रवासाचे वाढलेले अंतर, कर्जाची सुलभ व्यवस्था, चांगले मायलेज देणार्‍या मॉडेल्सचे वाढते प्रमाण, ई कॉमर्स, होम डिलिव्हरी अशा सुविधा यांचा मोठा हातभार आहे. होंडाने देशातील ३५ टक्के महिलांना त्यांच्या उत्पादनांकडे आकर्षित करून घेण्यात यश मिळविले असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment