बायकोचा त्रास असलेल्या पुरूषांसाठी आश्रम


औरंगाबादपासून जवळ १२किमीवर बायकोच्या त्रासाला कंटाळलेल्या नवर्‍यांसाठी आश्रम सुरू करण्यात आला असून पत्त्नी करत असलेल्या छळासंदर्भात कायदेशीर लढाई खेळण्यासाठी येथे सल्ला केंद्रही सुरू केले गेले आहे. केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर आंध्र, छत्तीसगढ, गुजराथ, कर्नाटक या राज्यातूनही बायकोच्या छळाची शिकार बनलेले नवरे येथे सल्ला घेण्यासाठी येत असून आत्तापर्यंत ५०० जणांना सल्ला दिला गेला असल्याचेही समजते. कायदेशीर सल्ला घेणार्‍यांची संख्या दिवसेनदिवन वाढत चालल्याचेही दिसून येत आहे.

भारत फुलारे यांनी त्याच्या १२०० चौरस फुटांच्या घरातच हा आश्रम सुरू केला असून ते स्वतः बायकोच्या छळाची शिकार आहेत असे समजते. घराच्या बाहेरच्या खोलीत कार्यालय असून तेथे थर्माकोलपासून बनविलेला मोठा कावळा आहे. या कावळ्याची सकाळ सायंकाळी उदबत्ती ओवाळून पूजा केली जाते. यामागे कारण सांगताना फुलारे म्हणतात, कावळी अंडी घालते आणि पसार होते. अ्रंडी उबविणे व पिलांना चारा देणे ही कामे कावळ्याला करावी लागतात. पत्नी पिडीत पुरूषांची परिस्थितीही अशीच असते म्हणून कावळा हे आमचे प्रतीक आहे.

या आश्रमात सध्या सात जण राहतात. आपले आपले काँट्रीब्युशन टाकून ते खर्च विभागून घेतात. रोजचा स्वयंपाक हे पुरूषच करतात. सल्ला घ्यायला येणार्‍यांना खिचडी खाऊ घातली जाते. १९ नोव्हेंबर हा पुरूष अधिकार दिवस म्हणून पाळला जातो. पिडीत पुरूषांसाठी अ, ब, क कॅटेगरी केल्या आहेत. या आश्रमात प्रवेशासाठी बायकोने नवर्‍याविरोधात किमान २० तक्रारी केलेल्या असल्या पाहिजेत. तसेच पोटगी न दिल्याबद्दल जेल वारी केलेले, दुसर्‍या लग्नाचा विचार केलेले, पत्नीच्या तक्रारींमुळे नोकरीवरून काढून टाकलेले अशांनाही प्रवेश आहे. अर्थात येथे राहायचे तर खर्च विभागून घ्यायचा व सर्व कामात सहभाग द्यायचा अशीही अट आहे.

Leave a Comment