फ्री वायफायचा मुंबईकरांनी केला बट्याबोळ


मुंबई – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील नागरिकांना फ्री वायफायची सुविधा पुरविण्यात आली. पण या वायफाय सुविधेचा उपयोग मुंबईकरांनी अशा कामासाठी केला आहे की जे ऐकल्यानंतर आपल्या सर्वाना धक्काच बसेल. दररोज तब्बल ३ लाख नागरिक मुंबईमध्ये फ्री वायफाय सुविधेचा लाभ घेतात पण त्यापैकी ३०,००० नागरिक पॉर्न वेबसाईट्स पाहण्यासाठी यासुविधेचा वापर करतात.

हा धक्कादायक खुलासा महाराष्ट्राच्या आयटी खात्याने देण्यात आलेल्या माहितीत करण्यात आला आहे. आयटी डिपार्टमेंटच्या मते, कुठलाच अॅडल्ट कंटेंन्ट पाहणा-या यूझर्सला रोखण्यासाठी उपाय नाही. या प्रकरणावर डिपार्टमेंटचे प्रिंसिपल सेक्रेटरी व्हि के गौतम यांनी म्हटले की, अॅडल्ट साइट्स पाहणा-या यूझर्सला शोधणे म्हणजे एक प्रकारचा उंदीर-माजराचा खेळ आहे.

व्हि के गौतम यांनी पुढे म्हटले की, आयटी खात्याने आतापर्यत काही पॉर्न साइट्स बॅन केल्या असून केंद्र सरकारला त्याची लिस्ट पाठविण्यात आली आहे. पण दुस-या डॉमेनने इतर पॉर्नसाइट पाहिल्या जातात. जी साइट ब्लॉक झाली ती दुस-या डोमेन नावाने पुन्हा सुरू करण्यात येते. त्यामुळे अशा यूझर्सला रोखणे खुपच कठीण आहे.

Leave a Comment