मायक्रोसॉफ्टने आणला सरफेस लॅपटॉप


नवी दिल्ली: मायक्रोसॉफ्टने सरफेस लॅपटॉप लाँच केला असून याविषयी न्यूयॉर्कमध्ये एक प्रेझेंटेशन देण्यात आले. विंडोज १० एस या ऑपरेटिंग सिस्टिमवर हा लॅपटॉप चालत असून मायक्रोसॉफ्टच्या या सरफेस लॅपटॉपला मॅकबुक, एअर व मॅकबुक प्रो या प्रकारच्या लॅपटॉप सदरातील उत्पादनाचे नवे आव्हान असणार आहे. हा सरफेस लॅपटॉप तब्बल दोन वर्षांच्या खडतर संशोधनानंतर तयार करण्यात आला आहे. हा लॅपटॉप १५ जूननंतर बाजारात उपलब्ध करून दिला जाणार आहे.

भारतात जरी सध्या हा लॅपटॉप लाँच होणार नसला तरी अमेरिका, न्यूझीलंड, ऑस्ट्रिया, बेल्जियम, डेन्मार्क, फिनलंड, फ्रान्स, र्जमनी, आयर्लंड, इटली, नेदरलँड, पोलंड, पोतरुगाल, स्वीडन, ब्रिटन आदी देशांमध्ये ऑनलाइन रजिस्टर करून हा लॅपटॉप खरेदी करता येणार आहे. याची किंमत ९९९ अमेरिकी डॉलर ऐवढी असून हा लॅपटॉप चार रंगांमध्ये उपलब्ध आहे.

लॅपटॉपची ताकद आणि टॅब्लेटची वैशिष्ट्ये सरफेस लॅपटॉपमध्ये असून कोअर ऑपरेटिव्ह सिस्टिममधील विंडोज १० एस हा लॅपटॉप असून मायक्रोसॉफ्टने विंडोज १० एस ही अतिशय नवी अशी ऑपरेटिंग सिस्टिम विकसित केली आहे. शैक्षणिक उपयुक्तता यावर प्राधान्याने लक्ष देण्यात आले असून वजनाला हलकी व अतिशय पातळ अशा जाडीचा असणारा सरफेस लॅपटॉप सातत्यपूर्ण कार्यकुशल ठरू शकेल. दिवसभर चालू शकेल अशी क्षमता याच्या बॅटरीची आहे. बॅटरी चार्ज केल्यानंतर १४.५ तास इतका वेळ ती चालू शकेल. त्याचप्रमाणे बुटिंगसाठी कमी वेळ घेणार्‍या पद्धतीचा आनंद या सरफेस लॅपटॉपमुळे मिळेल, असा कंपनीचा दावा आहे.

Leave a Comment