या देशात घरं बांधण्यासाठी विकत मिळते गुहा


न्यूयॉर्क: पूर्वी माणूस हा गुहेत राहत होता. मानवाने नंतर घर बांधण्याची कला अवगत केली आणि तो घर बांधून राहू लागला. पण आताच्या घडीला जग एवढे पुढे गेले आहे की जंगलात राहणारे अनेक लोकही आता वस्ती करून राहू लागले. असे असले तरी मानवाला आजही निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची ओढ असल्यामुळे अमेरिकेतील मिसौरी प्रांतामध्ये काही अशा गुहा आहेत, त्या पसंत पडल्यावर लोक खरेदी करतात व त्याचा राहण्यासाठी वापर करतात.

कर्ट आणि डेबोरा स्लीपर या दाम्पत्याने मिसौरीच्या फेस्टसमध्ये १५ हजार चौरस फुटांच्या एका गुहेमध्ये एक आलिशान बंगला बांधून घेतला आहे. लाकडापासून पार्टिशन या बंगल्याच्या आतमध्ये टाकण्यात आले आहे, तर त्याच्या भिंतीच्या जागी खडक आहेत. तीन एकर जमिनीताच ही गुहा असून २०१४ मध्ये स्लीपर दाम्पत्याने ती खरेदी केली होती. दोन मजल्यांचा हा बंगला कोणत्याही प्रकारच्या वातावरणाचा सामना करण्यास सक्षम आहे.

ऊर्जा मिळविण्यासाठी या बंगल्यामध्ये सौर पॅनेल बसविण्यात आली आाहे. या गुहा बंगल्याची खासियत म्हणजे त्याचे तापमान ना फार जास्त थंड असते, ना फार उष्ण. हा बंगला अशा ठिकाणी आहे की, तिथे राहणार्‍या लोकांना सदैव निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्याचा अनुभव मिळतो.

Leave a Comment