जीमेलवरील ‘ही’ लिंक उघडल्यास होईल पश्चाताप


तुमच्या जीमेल अकाऊंटवर येणारी एखादी अनपेक्षित लिंक गुगल डॉक्युमेंटमध्ये उघडू नका. अन्यथा तुम्हाला फार मोठ्या समस्येचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. गुगलने हजारो यूझर्सचे अकाउंट हॅक झाल्यानंतर हा खबरदारीचा इशारा दिला आहे.

अनेकांच्या जी-मेल आयडीवर एक गुगल डॉक्युमेंटची लिंक गेल्या काही दिवसांपासून येत आहे. तसेच संबंधित व्यक्तीचे गुगल अकाउंट ही लिंक ओपन केल्यास हॅक होत असल्याची बातमी समोर येत आहे.या लिंकमुळे हजारो यूजर्सची खाती हॅक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अल्फाबेटने अशा लिंकपासून सावधान राहण्याची सूचना केली आहे.

सध्या गुगल डॉक्युमेंटची एक लिंक जीमेल आयडीवर पाठविण्यात येत आहे, ही लिंक उघडणा-या व्यक्तीचे अकाउंट हॅक होत आहे. त्या लिंकवर क्लिक केल्यास एक नवे पान उघडते आणि पुन्हा अकाउंट लॉग-इन करण्यास सांगितले जाते. तेथे तुम्ही लॉग-इन झालात की आपली सगळी माहिती हॅकरपर्यंत पोहोचत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. याबाबत आपल्या ग्राहकांना सतर्क राहण्यास गुगलने सांगितले आहे.

Leave a Comment